ज्यांचा विश्वास जडला पायीं । हरिवीण कांही नेणती ॥१॥ त्याचा करी अंगिकार । निरसी अंधार ममतेचा ॥२॥ सत्यासत्य दाखवी तया । लावी आपुलीया निजसोई ॥३॥ निळा म्हणे ऐसें वर्म । सांपडे सुगम एकनिष्ठा ॥४॥