जेथें जेणें केला वास । तोचि वाटे त्यास निजग्राम ॥१॥ एरवीं सर्वहि भूमंडळ । आहें हें स्थळ याचेंचि ॥२॥ अवघेचि पाहोनि फिरोनि आला । परि त्या विसरला निजठायां ॥३॥ निळा म्हणे घेतलें सोंग । तेंचि त्यासी मग गोड वाटे ॥४॥