जें जें बोले तें विकळ । नाहीं विठठलीं कळवळ ॥१॥ कोरडेंचि शब्दज्ञान । नाहीं प्रेमाचें जीवन ॥२॥ जाणे तर्क वितर्क मति । समर्पक समयीं स्फूर्ती ॥३॥ निळा म्हणे पडिली हातीं । जाणिवेच्या नुगवे गुंती ॥४॥