जे जे येती वारकरी । भेटों हरि धांवे त्यां ॥१॥ म्हणे माझे अंतरंग । आले जिवलग भेटीसी ॥२॥ करुनी प्रीतीचा सोहळा । अवलोकीं डोळां क्षणक्षणां ॥३॥ निळा म्हणे आवडी ऐसा । होउनी सरिसा ठाके पुढें ॥४