जे जे येती वारकरी – संत निळोबाराय अभंग – ८९३
जे जे येती वारकरी ।
भेटों हरि धांवे त्यां ॥१॥
म्हणे माझे अंतरंग ।
आले जिवलग भेटीसी ॥२॥
करुनी प्रीतीचा सोहळा ।
अवलोकीं डोळां क्षणक्षणां ॥३॥
निळा म्हणे आवडी ऐसा ।
होउनी सरिसा ठाके पुढें ॥४
जे जे येती वारकरी ।
भेटों हरि धांवे त्यां ॥१॥
म्हणे माझे अंतरंग ।
आले जिवलग भेटीसी ॥२॥
करुनी प्रीतीचा सोहळा ।
अवलोकीं डोळां क्षणक्षणां ॥३॥
निळा म्हणे आवडी ऐसा ।
होउनी सरिसा ठाके पुढें ॥४