जारण मारण स्तंभन मोहन । वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥ येणेंचि मिरविती जगीं । अशुचि अनुरागीं निरंतर ॥२॥ जडयाबुटया हातीं शिरीं । ताईताभीतरीं वागविती ॥३॥ निळा म्हणे चिरकाळ नरकीं । वसावया कुंभपाकीं पूर्वजेंसी ॥४॥