जारण मारण स्तंभन मोहन – संत निळोबाराय अभंग – ८९१
जारण मारण स्तंभन मोहन ।
वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥
येणेंचि मिरविती जगीं ।
अशुचि अनुरागीं निरंतर ॥२॥
जडयाबुटया हातीं शिरीं ।
ताईताभीतरीं वागविती ॥३॥
निळा म्हणे चिरकाळ नरकीं ।
वसावया कुंभपाकीं पूर्वजेंसी ॥४॥