जाणिवेचें ज्ञान । तर्कवादाचें जल्पन ॥१॥ काय करुं तो गोमटा । भरला अहंकाराचा फाटा ॥२॥ बोले तें तें ताये ताये । नेणे परमार्थाचि सोये ॥३॥ निळा म्हणे तैसींची गती । पावे आपुलिया मती ॥४॥