या परी करुनियां त्याची गती – संत निळोबाराय अभंग ८९
या परी करुनियां त्याची गती ।
निजधामा पाठविला श्रीपती ।
लोकही विस्मय पावोनि चित्तीं ।
न कळे म्हणती हरिलीळा ॥१॥
हाचि ईशाचाही ईश ।
जगाचा आदी हा जगदीश ।
येथें दिसतो । मानुशवेश ।
परि हा अध्यक्ष भुवनत्रया ॥२॥
याचिया चरित्राची नवाई ।
एकेक सांगावी किती काई ।
अगाधपणेंचि बाळत्वही ।
प्रथ्मचि पूतना शोषिली ॥३॥
पाठीं माभळभटासी पिढेदान ।
शकट पादघतेंचि उडवून ।
यावरी कागबग निर्दाळून ।
रिठासुरा चावून सांडियेला ॥४॥
अघासुरही वनीं चिरिला ।
वत्सासुर तो धोपटिला ।
धेनुक प्राणेंसी बिघडविला ।
तृणावर्त लाविला मृत्युपंथे ॥५॥
ऐशी दिव्य चरित्राचिया खाणी ।
उघडिलिया येणें बाळपणीं ।
पुढें जे करील तेंही नयनीं ।
पाहों आइकों निवाडे ॥६॥
निळा म्हणे ऐसे जन ।
गोकुळींचे विस्मयापत्र ।
पुढें केशियाचें आख्यान ।
तेंही सकळिक आइका ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.
या परी करुनियां त्याची गती – संत निळोबाराय अभंग ८९