शुध्द सात्विकी ब्राम्हण – संत निळोबाराय अभंग – ८८८
शुध्द सात्विकी ब्राम्हण ।
सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥
रजतमें वैश्य निर्माण ।
शूद्रा तमो निर्मिता ॥२॥
नाना याति नाना भेद ।
यांपासुनी शाखा विविध ॥३॥
निळा म्हणे निषिध्द तमीं ।
अनामिकादि पापकर्मी विटाळ ॥४॥
हे तों याति स्वाभाव गुण ।
इष्ट कनिष्ठ अनादि भिन्न ॥५॥
अवघे ठायीं पंचभौतिक ।
आत्मा सकळां व्यापक एक ॥६॥
निळा म्हणे गुणवांटणी ।
योगी विभाग चहूं वर्णी ॥७॥