शहाणे तेचि परस्त्रीपाशीं – संत निळोबाराय अभंग – ८८७

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं – संत निळोबाराय अभंग – ८८७

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं ।
क्षणहि सहवासीं न बैसती ॥१॥
येती जाती तरी ते दुरी ।
चौघाभीतरी त्याचिसवें ॥२॥
तेथें कैंचा विकल्प वाढे ।
शूर ते गाढे निवडले ॥३॥
निळा म्हणे काळासी धाक ।
इतरांचा लेख काय तेथें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं – संत निळोबाराय अभंग – ८८७