विदयामानें गर्वताठा । धरुनि प्रतिष्ठा वाढविती ॥१॥ नेणती जेणें देव हातीं । लागे ते युक्ति हारविली ॥२॥ काम्यनिषिध्दीं आदर थोर । जप ते अघोर मंत्रांचे ॥३॥ निळा म्हणे यातना थोरी । नकीं अघोरी पडावया ॥४॥