विठ्ठल नाहीं ज्या ठाउका । परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥ करितो तें पोटासाठीं । बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥ दावील तें जाणा सोंग । धरुनि परमार्थाचें अंग ॥३॥ निळा म्हणे टिळें माळा । धरिला वृथा तो भोंपळा ॥४॥