विठ्ठल नाहीं ज्या ठाउका – संत निळोबाराय अभंग – ८८४
विठ्ठल नाहीं ज्या ठाउका ।
परमार्थचि त्याचा लटिका ॥१॥
करितो तें पोटासाठीं ।
बाष्कळ अवघीच चावटी ॥२॥
दावील तें जाणा सोंग ।
धरुनि परमार्थाचें अंग ॥३॥
निळा म्हणे टिळें माळा ।
धरिला वृथा तो भोंपळा ॥४॥