जाणोनियां मनींचा हेत – संत निळोबाराय अभंग – ८८३

जाणोनियां मनींचा हेत – संत निळोबाराय अभंग – ८८३

जाणोनियां मनींचा हेत ।
केलें सनाथ मजलागीं ॥१॥
कृपावंत संत सद्गुरु ।
भवार्णव तारुं मजलागी ॥२॥
बोलविली आरुषवाणी ।
श्रीहरिच्या गुणीं आपुलिये ॥३॥
निळा म्हणे नवलचि केलें ।
अंकिता गौरविलें निज अंकीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाणोनियां मनींचा हेत – संत निळोबाराय अभंग – ८८३