विश्वासी ते ऐकतां कानीं – संत निळोबाराय अभंग – ८८३

विश्वासी ते ऐकतां कानीं – संत निळोबाराय अभंग – ८८३

विश्वासी ते ऐकतां कानीं ।
धरिती मनीं आदरें ॥१॥
पूर्वार्जितें उत्तमें होतीं ।
आली सत्संगती भेटो ते ॥२॥
सुखें सुखें वाढतें झालें ।
केलिया विठठलें कृपा मग ॥३॥
निळा म्हणे निजात्मसुखा ।
पावलें एका क्षणमात्रें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विश्वासी ते ऐकतां कानीं – संत निळोबाराय अभंग – ८८३