ब्रम्हीभूत होते काया – संत निळोबाराय अभंग – ८८२

ब्रम्हीभूत होते काया – संत निळोबाराय अभंग – ८८२

ब्रम्हीभूत होते काया ।
श्रीहरि पायां अनुसरतां ॥१॥
परि हा विश्वास नुमटे मनीं ।
जाती म्हणऊनि निरया गांवां ॥२॥
जिहीं केला हा सायास ।
पावले पदास ते संत ॥३॥
निळा म्हणे अनुभवसिध्द ।
ऐसा प्रसिध्द कलियुगीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ब्रम्हीभूत होते काया – संत निळोबाराय अभंग – ८८२