बुध्दीसि निश्चय नाहीं साचा – संत निळोबाराय अभंग – ८८१

बुध्दीसि निश्चय नाहीं साचा – संत निळोबाराय अभंग – ८८१

बुध्दीसि निश्चय नाहीं साचा ।
तोचि भ्रांतीचा मुळारंभा ॥१॥
तयाचि नांव म्हणिजे वेडें ।
असोनि पुढें न देखे हित ॥२॥
लज्जा मात्र हारपोनि जाये ।
नागवेंचि ठायें उभें मग ॥३॥
निळा म्हणे न धरीं धीर ।
न मानी उत्तर सांगितलें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बुध्दीसि निश्चय नाहीं साचा – संत निळोबाराय अभंग – ८८१