चित्तीं माझें पांडुरंग – संत निळोबाराय अभंग – ८७९

चित्तीं माझें पांडुरंग – संत निळोबाराय अभंग – ८७९

चित्तीं माझें पांडुरंग ।
बैसला अभंग न ढळेसा ॥१॥
जातां दिवस जातां राती ।
स्वप्नीं जागृतीं सुषुप्तीं तो ॥२॥
देखतां डोळा ऐकतां कानीं ।
बोलतां वदनीं तोचि पुढें ॥३॥
निळा म्हणे बुध्दीमन ।
गेलीं विरोन त्यामाजीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

चित्तीं माझें पांडुरंग – संत निळोबाराय अभंग – ८७९