अश्व पाहतां तो सोज्ज्वळा । म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥ तैसें नांवापासीं काये । करणी आहे विचित्र ॥२॥ केशविंचरिती फणी । तरी काय बहिणी शेषाची ॥३॥ निळा म्हणे सुगरणी । नांवें केरसुणी झाडिती ॥४॥