अवघेंचि हें कर्मफळ – संत निळोबाराय अभंग – ८७८
अवघेंचि हें कर्मफळ ।
ओढवलें सकळ जगत्रया ॥१॥
स्वर्ग मृत्यु पाताळ लोक ।
कर्मबाधक म्हणोनियां ॥२॥
कर्मातीत झाले नर ।
तया लोकांतर मग कैंचें ॥३॥
निळा म्हणे पृथक होती ।
म्हणोनि भोगिती पृथकांतें ॥४॥
अवघेंचि हें कर्मफळ – संत निळोबाराय अभंग – ८७८
अवघेंचि हें कर्मफळ ।
ओढवलें सकळ जगत्रया ॥१॥
स्वर्ग मृत्यु पाताळ लोक ।
कर्मबाधक म्हणोनियां ॥२॥
कर्मातीत झाले नर ।
तया लोकांतर मग कैंचें ॥३॥
निळा म्हणे पृथक होती ।
म्हणोनि भोगिती पृथकांतें ॥४॥