अभिमानाच्या भुली । ज्या त्या कर्मीं लिप्त झाली ॥१॥ नेणोनिया ज्ञानमूढें । भोगासक्त पुढें पुढें ॥२॥ म्हणती अंगें आम्हीं केलें । सहजें जें जें घडोनि आलें ॥३॥ निळा म्हणे मत्तें ऐसीं । गुंतली ते काळापाशीं ॥४॥