अभिमानाच्या भुली – संत निळोबाराय अभंग – ८७६
अभिमानाच्या भुली ।
ज्या त्या कर्मीं लिप्त झाली ॥१॥
नेणोनिया ज्ञानमूढें ।
भोगासक्त पुढें पुढें ॥२॥
म्हणती अंगें आम्हीं केलें ।
सहजें जें जें घडोनि आलें ॥३॥
निळा म्हणे मत्तें ऐसीं ।
गुंतली ते काळापाशीं ॥४॥