अभिशापासी कारण – संत निळोबाराय अभंग – ८७५

अभिशापासी कारण – संत निळोबाराय अभंग – ८७५

अभिशापासी कारण ।
मुख्य संभाषण परस्त्रीचें ॥१॥
सहज एकांती बोलूं जातां ।
उपजे विकल्पता सकळांसी ॥२॥
मग तें अपघातासी मूळ ।
करी तात्काळ नावरत ॥३॥
निळा म्हणे प्रमादी ऐसी ।
प्रमदेपासीं अखंड ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अभिशापासी कारण – संत निळोबाराय अभंग – ८७५