श्रोते वक्ते होती सुखी । अध्यात्मविखीं भाविक ॥१॥ ऐसा केला प्रसंग हरी । आरुष वैखरी वदवूनी ॥२॥ साबडेंचि परी रुचे ऐसें । केलें सौरसें आपुलिया ॥३॥ निळा म्हणे आपुला भक्त गुणीं । केली वोवणी अक्षरां ॥४॥