संती ठेविलें निश्चळ ठायीं । चित्त हें पायीं आपुलीये ॥१॥ तेणें समाधन वृत्ती । नव्हेचि स्थिति पालट ॥२॥ अखंडिता राहिले ध्यान । होउनी उन्मन मनाचें ॥३॥ निळा म्हणे कृपा केली । जाणों आली या अर्थ ॥४॥