संतीं सांगितलें मज । आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥ म्हणती आठवीं पंढरीनाथा । सांडीं वार्ता इतरांची ॥२॥ नको विसबों तूं यासी । अगाध सुखासि पावशील ॥३॥ निळा म्हणे सेवा आतां । हेचि प्रसन्नता आमुची ॥४॥