संतीं सांगितलें मज – संत निळोबाराय अभंग – ८७१
संतीं सांगितलें मज ।
आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥
म्हणती आठवीं पंढरीनाथा ।
सांडीं वार्ता इतरांची ॥२॥
नको विसबों तूं यासी ।
अगाध सुखासि पावशील ॥३॥
निळा म्हणे सेवा आतां ।
हेचि प्रसन्नता आमुची ॥४॥
संतीं सांगितलें मज ।
आपुलिये गुज अंतरींचे ॥१॥
म्हणती आठवीं पंढरीनाथा ।
सांडीं वार्ता इतरांची ॥२॥
नको विसबों तूं यासी ।
अगाध सुखासि पावशील ॥३॥
निळा म्हणे सेवा आतां ।
हेचि प्रसन्नता आमुची ॥४॥