संतकृपावरदबळें – संत निळोबाराय अभंग – ८७०

संतकृपावरदबळें – संत निळोबाराय अभंग – ८७०


संतकृपावरदबळें ।
माझीं वचनामृतफळें ॥१॥
स्वीकारिजे पंढरीनाथें ।
बैसोनियां सादर चितें ॥२॥
म्हणती गोड हे तुझी वाणी ।
सद्गुरुकृपेचीं बोलणीं ॥३॥
निळा म्हणे श्रोते संत ।
प्रसन्नपणें दत्तचित्त ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतकृपावरदबळें – संत निळोबाराय अभंग – ८७०