संती केला अंगिकार । मज हा निर्धार बाणला ॥१॥ त्यांचिया बोलें अभयदानें । नि:शंक वचनें हीं ऐशीं ॥२॥ नाहीं कोठें गोंवागुंती । अक्षरें चालती गुंफिलीं ॥३॥ निळा म्हणे सत्यासाठी । जाणती चावटी माझी ते ॥४॥