संती केला अंगिकार – संत निळोबाराय अभंग – ८६९
संती केला अंगिकार ।
मज हा निर्धार बाणला ॥१॥
त्यांचिया बोलें अभयदानें ।
नि:शंक वचनें हीं ऐशीं ॥२॥
नाहीं कोठें गोंवागुंती ।
अक्षरें चालती गुंफिलीं ॥३॥
निळा म्हणे सत्यासाठी ।
जाणती चावटी माझी ते ॥४॥
संती केला अंगिकार ।
मज हा निर्धार बाणला ॥१॥
त्यांचिया बोलें अभयदानें ।
नि:शंक वचनें हीं ऐशीं ॥२॥
नाहीं कोठें गोंवागुंती ।
अक्षरें चालती गुंफिलीं ॥३॥
निळा म्हणे सत्यासाठी ।
जाणती चावटी माझी ते ॥४॥