माझा बोल खरा चाल खरा । मती विस्तारा फांकविली ॥१॥ विठ्ठल देवें केली कृपा । दाविला सोपा निज पंथ ॥२॥ यावें जावें पंढरपुरा । आपुल्या माहेरा वस्तिसी ॥३॥ निळा म्हणे घातली सुती । माझिये हातीं कृपाघनें ॥४॥