ब्रम्हानंदे गर्जे वाणी – संत निळोबाराय अभंग – ८६७
ब्रम्हानंदे गर्जे वाणी ।
हरिच्या गुणीं मातली ॥१॥
आंवरिताही नावरती ।
पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥
अवतारचरित्रें जन्मकर्मे ।
क्रीडा संभ्रमें केलीं ते ॥३॥
निळा म्हणे घडघडाट ।
चालती लोट नावरती ॥४॥
ब्रम्हानंदे गर्जे वाणी ।
हरिच्या गुणीं मातली ॥१॥
आंवरिताही नावरती ।
पूरचि लोटति अक्षरांचे ॥२॥
अवतारचरित्रें जन्मकर्मे ।
क्रीडा संभ्रमें केलीं ते ॥३॥
निळा म्हणे घडघडाट ।
चालती लोट नावरती ॥४॥