सुफळ जिणें हरिच्या भजनें । चुकलीं पतनें यमजाच ॥१॥ नित्य करितां हरिकीर्तन । गातां गुण निजआवडी ॥२॥ घडतां संतसमागम । हरीचें प्रेम दुणावलें ॥३॥ निळा म्हणे साधिली वेळ । सकळाही मंगळ मंगळाची ॥४॥