नेणों काय पुर्वार्जित – संत निळोबाराय अभंग – ८६४
नेणों काय पुर्वार्जित ।
होतें सुकृत निक्षेपिचें ॥१॥
तेंणें हातीं धरोनियां ।
संती ठाया पावविलों ॥२॥
विटेवरी दाविलें धन ।
होते पोटाळुन महर्षी ज्या ॥३॥
निळा म्हणे बैसला ध्यानीं ।
ज्याचिये चिंतनी सदाशिव ॥४॥