माझिये मनीचा फिटला बेहो । देखताचि नाहो रुक्मीणीचा ॥१॥ कळिकाळ ते काय बापुडें रंक । होऊनि मशक ठेलें पुढें ॥२॥ कामक्रोधां कैंची उरी । दोषां महामारी हो सरली ॥३॥ निळा म्हणे नि:संदेहो । देहीं देंहो हारपला ॥४॥