रुप देखतांचि लोचनीं । राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥ माझिया जिवाचें जीवन । विठ्ठल नामाचें मोहन ॥२॥ चित्त विगुंतलें पायीं । देहभावहि नुरोचि देहीं ॥३॥ निळा म्हणे जीवप्राण् । तेथेंचि राहिला इ जडोन ॥४॥