संत निळोबाराय अभंग

रुप देखतांचि लोचनीं – संत निळोबाराय अभंग – ८६२

रुप देखतांचि लोचनीं – संत निळोबाराय अभंग – ८६२

रुप देखतांचि लोचनीं ।
राहिलें तें ध्यानीं मनीं ॥१॥
माझिया जिवाचें जीवन ।
विठ्ठल नामाचें मोहन ॥२॥
चित्त विगुंतलें पायीं ।
देहभावहि नुरोचि देहीं ॥३॥
निळा म्हणे जीवप्राण्‍ ।
तेथेंचि राहिला इ जडोन ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

रुप देखतांचि लोचनीं – संत निळोबाराय अभंग – ८६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *