उपाधीचा उबग आला । मनिं आवडला सत्संग ॥१॥ तयासी देवेंचि कृपा केली । भ्रांति निरसली बुध्दीची ॥२॥ कल्पनेचा पुसला ठाव । देहभाव हारपला ॥३॥ निळा म्हणे निरभिमान । झालें उन्मन मनाचें ॥४॥