होवोनियां निश्चळ । स्थिर राहिलों अढळ ॥१॥ नाहीं भय शंका मनीं । विश्वास मानियला वचनीं ॥२॥ ज्याचें तया पुढें । बोलेन वेडेही वांकडें ॥३॥ निळा म्हणे देवें । वदविलें तें वदेन भावें ॥४॥