होवोनियां निश्चळ – संत निळोबाराय अभंग – ८५९
होवोनियां निश्चळ ।
स्थिर राहिलों अढळ ॥१॥
नाहीं भय शंका मनीं ।
विश्वास मानियला वचनीं ॥२॥
ज्याचें तया पुढें ।
बोलेन वेडेही वांकडें ॥३॥
निळा म्हणे देवें ।
वदविलें तें वदेन भावें ॥४॥
होवोनियां निश्चळ ।
स्थिर राहिलों अढळ ॥१॥
नाहीं भय शंका मनीं ।
विश्वास मानियला वचनीं ॥२॥
ज्याचें तया पुढें ।
बोलेन वेडेही वांकडें ॥३॥
निळा म्हणे देवें ।
वदविलें तें वदेन भावें ॥४॥