होतें पूर्वार्जित । उत्तम संग्रहीं संचित ॥१॥ तेंचि उत्तीर्णत्वालागीं । झालें सन्मुख ये प्रसंगीं ॥२॥ भोग मोक्ष फळें । निवारलीं शांतिबळें ॥३॥ निळा म्हणे सहजचि आला । ओघ अमृताचा हा जिव्हाळा ॥४॥