वदविली आरुषवाणी । वैदिक पुराणीं मिश्रित ॥१॥ म्हणोनियां संतसज्जन । करिती श्रवण बैसोनी ॥२॥ अर्थ तात्पर्याचे घेती । आणि डोलविती मस्तक ॥३॥ निळा म्हणे ऐसें केलें । मज या विठठलें दयाघनें ॥४॥