आर्त माझें पूर्ण झालें – संत निळोबाराय अभंग – ८५६

आर्त माझें पूर्ण झालें – संत निळोबाराय अभंग – ८५६

आर्त माझें पूर्ण झालें ।
यांची पाउलें देखतां ॥१॥
आतां कोठें न धांवे मन ।
राहिलें होऊन अचंचळ ॥२॥
याविण कांहीं नलगे जोडी ।
पुरली आवडी विषयाची ॥३॥
निळा म्हणे ध्यानीं मनीं ।
राहो चिंतनी हेंचि रुप ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आर्त माझें पूर्ण झालें – संत निळोबाराय अभंग – ८५६