आठवितां याचे पाय । गेलें निरसोनि संसारभय ॥१॥ अवघा काळ अवघी वेळ । स्मरणें याचिया सुमंगळ ॥२॥ सदैव आम्हीं भूमंडळीं । पढो हरिच्या नामावळी ॥३॥ निळा म्हणे यावरी आतां । नेणों जन्ममरणचिंता ॥४॥