सुखें जन्मातरें घेऊं । नामें आळवूं श्रीहरीचीं ॥१॥ नाहीं आम्हा त्याचें कोडें । संसार बापुडें तें काये ॥२॥ कळिकाळाचें भय तें किती । पाया पडति यमधर्म ॥३॥ निळा म्हणे सर्वहि सिध्दी । रुळती पदीं हरिनामें ॥४॥