सुखें जन्मातरें घेऊं – संत निळोबाराय अभंग – ८४९
सुखें जन्मातरें घेऊं ।
नामें आळवूं श्रीहरीचीं ॥१॥
नाहीं आम्हा त्याचें कोडें ।
संसार बापुडें तें काये ॥२॥
कळिकाळाचें भय तें किती ।
पाया पडति यमधर्म ॥३॥
निळा म्हणे सर्वहि सिध्दी ।
रुळती पदीं हरिनामें ॥४॥