भावें वोजावली भूमिका – संत निळोबाराय अभंग – ८४६

भावें वोजावली भूमिका – संत निळोबाराय अभंग – ८४६


भावें वोजावली भूमिका ।
वरी कृपाघन वोळला निका ।
संतीं बीज दीधला फुका ।
तेचि पेरिलें तोचि क्षणीं ॥१॥
वाफलें तें वरावरी ।
कणिसें दाट आल्या घुमरी ।
पिकलें न समाये अंबरीं ।
चहुकोनि सारिखेचि ॥२॥
निळा केला भाग्यवंत ।
सवंगीता नावरे पीक अदभुत ।
रसीवा केला नलगे अंत ।
माप करितां नावरेसा ॥३॥
उमाणु जातां अधीकची वाढे ।
दिसोंचि लागे पुढें पुढें ।
सांजे भरले सीग नमोडे ।
मोडति गोड ओढितां ॥४॥
नवल पिकाची हे धणी ।
होती संतकृपेची पेरणी ।
पुरे पुरे नव्हेचि उणी ।
पदरीं भरुनि बैसलों ॥५॥
निळा झाला सदैव आतां ।
अपार लेखाचि नव्हे चित्ता ।
साठऊं जाणतां नेणता ।
राहो भरिता उरलें तें ॥६॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा

भावें वोजावली भूमिका – संत निळोबाराय अभंग – ८४६