मावळली खंती – संत निळोबाराय अभंग – ८४५
मावळली खंती ।
देहीं देहाची विस्मृती ॥१॥
पांडुरंग ध्यानीं मनीं ।
रुप बैसलें लोचनीं ॥२॥
पांडुरंग ध्यानीं मनीं ।
रुप बैसलें लोचनीं ॥३॥
नये कळों दिवस रातीं ।
स्वप्न निद्रा ना जागृती ॥४॥
निळा म्हणे अखंडता ।
विठ्ठल रुपीं तादात्म्यता ॥५॥