मस्तक माझा पायावरी – संत निळोबाराय अभंग – ८४३

मस्तक माझा पायावरी – संत निळोबाराय अभंग – ८४३

मस्तक माझा पायावरी ।
या वारकरी संतांच्या ॥१॥
प्रतिवर्षी पंढरपुरा ।
जाती महावव्दरा हरि भेटी ॥२॥
भेटी त्याची इच्छी मन ।
करिती कीर्तन अनुदिनीं ॥३॥
निळा म्हणे लोटांगण ।
घालित जाईन सामोरा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मस्तक माझा पायावरी – संत निळोबाराय अभंग – ८४३